सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
पर्यावरण संरक्षण व ग्रामीण पर्यटनासाठी वाघळवाडी-सोमेश्वरनगर येथे ‘नक्षत्र वनउद्यान’ प्रकल्प राबवला जात असून नागरिक, संस्था, सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थ्यांच्या योगदानातून तब्बल एक लाख नऊ हजार रूपयाच्या झाडांचे संकलन झाले असून आत्तापर्यंत तब्बल पाच हजार पाचशे झाड़ांचे रोपण करून त्याला ठिबकने पाणी देण्यात येत आहे.
या ठिकाणी सोमेश्वर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी अधिकारी व कर्मचारी वर्गासोबत भेट देऊन कामांची पाहणी केली व या दरम्यान त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी विभाग प्रमुख योगीराज नांदखिले, विराज निंबाळकर, धनंजय होळकर, बापूराव गायकवाड, संतोष शिंदे, अनिल सातपुते, सपंत गावडे, विजयसिंह फाळके, काकासो सकुंडे,तसेच प्रदीप धापटे, संतोष शेंडकर, तुषार सकुंडे, गणेश जाधव, जितेंद्र सकुंडे, अनिल शिंदे, योगेश सोळस्कर, माया काळे, सागर चव्हाण तसेच कारखान्यातील कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
“हा परिसर लवकरच पर्यटनाचे केंद्र बनेल, निसर्ग जपण्यासाठी सर्वांनी मिळून काम केले पाहिजे,” असे मत यादव साहेबांनी यावेळी व्यक्त केले
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने वनविभाग बारामती, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आणि ग्रामपंचायत वाघळवाडी-सोमेश्वरनगर यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा प्रकल्प आकार घेत आहे.
सोमेश्वरचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप व संचालक मंडळाने कारखान्याच्या माध्यमातून ठिबक सिंचन, शेततळे,खड्डे आदी कामे केली असून पाणी व्यवस्थापनावर विशेष लक्ष देत आतापर्यंत ५,५०० झाडांचे वृक्षारोपण केले आहे.
अजित पवार यांच्या माध्यमातून शासनाकडून मिळालेल्या रू २.५ कोटी निधीतून बैठक व्यवस्था, पायवाट, नक्षत्र वन, मियावाकी प्रकल्प, पॅगोडा, गॅबियन वॉल व टेहाळणी मनोरा अशी आदी पर्यटनस्थळ विकासाची कामे सुरू आहेत.
हरित साकारासाठी झाडाच्यासाठी सरपंच अॅड. हेमंत गायकवाड यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याने पळस, बहावा, करंज, कांचन, आवळा, रानभेंडी आदी एक लाख नऊ हजारांची झाडे संकलित झाली.
*यांनी केले झाडांच्यासाठी मोलाचं योगदान*-
केशव जाधव, राजेंद्र बडदे, किरण आळंदीकर, रोहिदास कोरे, प्रदीपबापू धापटे, चंद्रशेखर जगताप, हर्षद जगताप, मंगेश कदम, जीवन सावंत, देव सावळकर, सतीश जगदाळे, डी.वाय. जगताप, सूर्यकांत सूर्यवंशी, विजय जगताप, कालिदास गरुड, मिलिंद भापकर,सुरज जाधव,अशोक भानुदास शिर्के, जालिंदर शिर्के,रामदास डोईफोडे,राजाभाऊ पानसरे,विजयसिंह फाळके यांच्या माध्यमातून रघुनाथ ढोणे (देवराई) यांनी १५०० तर आर. एन. शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट यांनी १००० झाडे योगेश सोळस्कर, प्रमोद पानसरे, गणेश भोसले यांनी एमकेसीएल ला २५ वर्ष झालेबद्दल आणि विद्या प्रतिष्ठान स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देखील विविध प्रकारची झाडं देवून सामाजिक भान दाखवलं. साद संवाद ग्रुप वाणेवाडी च्या सदस्यांनी वृक्षारोपणासाठी श्रमदान केले. झाडांच्या वाढीसाठी अजित सकुंडे यांनी मोफत औषधे दिली.
विवेकानंद अभ्यासिकेचे गणेश सावंत यांच्या पुढाकारातून शंभरहून अधिक सदस्यांनी स्वच्छता व झाडांचे संवर्धन केले. या उपक्रमात शशिकांत जेधे, योगेश काळेल, माजी सैनिक गणपत महापुरे, मिलिंद भापकर, पंकज सावंत, गणेश शिंदे सहभागी झाले.
‘नक्षत्र वनउद्यान’ हे केवळ एक हिरवे उद्यान न राहता, भविष्यातील एक उत्तम पर्यटनस्थळ, पर्यावरण संवर्धनाचं केंद्र आणि सामाजिक एकतेचं प्रतीक ठरेल.