Baramati News l स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांनी नक्षत्र वनउद्यानातील एक तासात गोळा केला तब्बल एक टन कचरा

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाघळवाडी येथील  वनविभागाच्या हद्दीतील नक्षत्र वन उद्यान येथे आज सकाळी सात वाजता स्वच्छता व वृक्षसंवर्धन मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत विवेकानंद अभ्यासिकाच्या शंभरहून अधिक सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अभ्यासिकेचे गणेश सावंत यांच्या पुढाकारातून ही मोहीम पार पडली. सदस्यांनी श्रमदानातून उद्यान परिसरातील टनभर सुका कचरा गोळा करून परिसर स्वच्छ ठेवण्याचा आदर्श घालून दिला.
        या उपक्रमात विशेषतः विद्यार्थी व विद्यार्थिनींचा मोठा सहभाग दिसून आला. स्वच्छतेबरोबरच झाडांचे संवर्धन व परिसर हरित ठेवण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला. मोहिमेसाठी आवश्यक असलेले हँडग्लोज प्राथमिक आरोग्य केंद्र, होळ यांच्या माध्यमातून परवेझ मुलानी यांनी उपलब्ध करून दिले, ज्यामुळे सहभागी सदस्यांना काम अधिक सुरक्षितपणे करता आले.
         या मोहिमेत विवेकानंद अभ्यासिकेच्या सदस्यांसोबतच विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांनीही सक्रिय सहभाग घेतला. शशिकांत जेधे, योगेश काळेल, माजी सैनिक गणपत महापुरे, मिलिंद भापकर, पंकज सावंत, गणेश शिंदे यांसह अनेकांनी या उपक्रमात हजेरी लावली. त्यांच्या योगदानामुळे स्वच्छता अभियान अधिक प्रभावी ठरले.
                नक्षत्र वन परिसरातील ही मोहीम केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित न राहता, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ठरली. विवेकानंद अभयसिकेतील सदस्यांनी एकत्र येऊन केलेले हे श्रमदान म्हणजे पर्यावरण रक्षणासाठीचे सकारात्मक पाऊल असल्याचे  मत वाघळवाडी चे सरपंच हेमंत गायकवाड यांनी व्यक्त केले.
To Top