Baramati News l सुपे येथे विविध क्षेत्रातील नवदुर्गांचा सत्कार

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दीपक जाधव 
सुपे ( ता. बारामती ) येथे शारदीय नवरात्र उत्सावाच्यानिमित्ताने येथील चांदगुडे आर्केटमध्ये विविध क्षेत्रातील नवदुर्गाचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर गरभा आणि दांडियाचा कार्यक्रम झाला. 
     सुपे येथील नवदुर्गा प्रतिष्ठानच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
यावेळी दीपप्रज्वलन आणि दुर्गामातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 
      यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या छाया सोडनवर, पायल ढमे, दिपाली दोरगे, कासुबाई जगताप, संध्या सै॓दर, शिल्पा पारटकर, बायडा बारवकर, सुनिता शिंदे, रोशन शिकीलकर आदी नवदुर्गांचा सत्कार करण्यात आला. 
     या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य मालन चांदगुडे, सरपंच तुषार हिरवे, सुपे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे आदीसह सुपे परिसरातील महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पेश जगताप यांनी केले. 
          .....................................

To Top