Bhor News l भोरला महसूल विभागात एका क्लिकवर सर्व सेवा उपलब्ध : 'क्यूआर कोड' चे लोकार्पण

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
 महसूल विभागात नागरिकांना सतत हेलपाटे मारावे लागू नये यासाठी भोर तहसील कार्यालयाने तांत्रिक बाबींची पूर्तता करीत क्यूआर कोड प्रणाली तयार केली.नागरिकांना 'क्यूआर कोड'द्वारे महसूल विभागातील सर्व सेवा देण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला असून जिल्ह्यात महसूल विभागात भोर तालुका पहिला उपक्रम  राबवणारा तालुका ठरला आहे.
    हा उपक्रम श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राबवण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते गुरुवार दि. २५ उपक्रमाचे लोकार्पण झाले. या वेळी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, आमदार शंकर मांडेकर उपस्थित होते.प्रांताधिकरी डॉ. खरात यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार राजेंद्र नजन यांनी महसूल विभागाच्या सर्व सेवा नागरिकांना एकाच प्रणालीतून कशा देता येतील यावर विचार केला असून महसूल विभागाकडून नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत
To Top