Baramati News l पत्रकार मनोहर तावरे, पत्रकार सोमनाथ भिले राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष सोमनाथ भिले व संघाचे मा. अध्यक्ष मनोहर तावरे यांना नुकतेच राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच मोरगाव चे कलाशिक्षक ज्ञानेश्वर राऊत यांना देखील हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 
        कला व पत्रकारिता क्षेत्रात राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नुकतीच निवड जाहीर करण्यात  आली. पुणे येथील श्री यश एज्युकेशन फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने जिजामाता सांस्कृतिक भवन बारामती येथे पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात आला. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांना यावेळी कृषीमंत्र्यांचे हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
        या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई महापालिका सहाय्यक आयुक्त महादेव शिंदे सह उद्योजक प्रकाश नेवसे, एग्रीकल्चर फार्म चे प्रमुख एस एस सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रातून आलेल्या विविध कला पथकांनी रंगमंचावर आपली कला सादर केली. रयत शिक्षण संस्थेच्या मोरगाव येथील श्री मयुरेश्वर माध्यमिक  विद्यालयाचे कलाशिक्षक ज्ञानेश्वर राऊत यांचे सह ग्रामीण पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या मोरगाव  येथील मनोहर तावरे यांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला. तसेच 
सोमनाथ भिले यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून गोरगरीब नागरिकांचे तसेच अनेक सामजिक, जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावले आहेत. ते वै. काळे महाराज सांप्रदायिक भारुड भजनी मंडळ प्रतिष्ठान डोर्लेवाडीचे संस्थापक अध्यक्ष असून गेली २५ वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात भारुडाच्या कार्यक्रमातून व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलन, बेटी बचाव, एड्स आदी विषयांवर समाजप्रबोधन, जनजागृती. वृक्षारोपण, सायकल मोहीम. रक्तदान शिबीर, राज्यस्तरीय भजन स्पर्धांचे आयोजन केले आहे. शिवाय सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग असतो. गावातील संपूर्ण दारूबंदी करण्यासाठी भजनी मंडळाच्या माध्यमातून प्रयत्न. जिल्ह्यातील पहिली उभी बाटली आडवी. सन २००९ पासून गावातील संपूर्ण दारू व्यवसाय बंद झाले आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न. आदर्श ग्रामपंचायत, पर्यावरणग्राम पुरस्कार, तंटामुक्त गाव पुरस्कार मिळविण्यासाठी प्रयत्न त्यांच्या या विविध कार्याची दखल घेऊन संस्थेच्या वतीने पुरस्कार देण्यात आला आहे.
To Top