Baramati News l यंदाच्या वर्षी मोरगावच्या बैलपोळा सणावर सुपे पोलिसांचा वॉच..! नृत्यांगना करमणूक नाहीच..? ध्वनी प्रदूषणावर देखील मर्यादा

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव : प्रतिनिधी 
गेली अनेक वर्ष मोरगाव येथील बैल पोळा एका खास कारणामुळे चर्चेत होता. परंतु यावेळी मात्र; सुपे पोलिसांनी बैलगाडा मालक यांना साध्या पद्धतीने सण साजरा करण्याची सूचना दिले आहेत. या निमित्ताने आंबट शौकीन थोडे नाराज झालेत. मात्र ; पोलिसांच्या निर्णयाचे सर्व सामान्य ग्रामस्थांनी स्वागत केले.

       बारामती तालुक्याच्या पश्चिम विभागात मोरगाव येथे सर्वात मोठा बैलपोळा सण साजरा केला जातो. या परिसरात बैलगाडा शर्यत शौकीन मोठ्या प्रमाणात असल्याने या बैलांची संख्या जास्त आहे. दरवर्षी येथे भाद्रपदी अमावश्या बैलपोळा साजरा करताना लाखो रुपयांची उधळण केली जाते.

      मिरवणुकीच्या निमित्ताने असलेले वाद्य डीजे आवाज मर्यादा तपासण्यासाठी विषेश यंत्रणा तैनात आहे. मोरगाव मुख्य बाजारपेठ असल्याने परिसरातील वाडी वस्ती वरून शेतकरी आपले बैल  जोड्या घेऊन गावात येत असतात. गावातील ठराविक ठिकाणी मानपान नुसार या मिरवणुका निघतात. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आज अनेक ठिकाणी असेल साजरा करण्यात आला. सध्या मात्र बहुतेक ठिकाणी या जनावरांची संख्या कमी झाल्याचे चित्र आहे.
    
     वर्षातून एक वेळ साजरा होणारा शेतकऱ्यांचा सण आनंदात जावा यांना कुठल्याही प्रकारे अडचण नको यासाठी सुपे पोलीस ठाण्यातील एक विशेष पथक तैनात आहे.

To Top