सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी बारामती सराफ असोसिएशनने मदतीचा हात पुढे करत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल ७५ हजारांची आर्थिक मदत दिली. ही मदत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे काल बारामती येथे सुपूर्द करण्यात आली.
सराफ असोसिएशनचे अध्यक्ष किरण आळंदीकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, चंदूकाका सराफ पेढीचे प्रमुख किशोरकुमार सराफ, बागडे बंधू (सातारारोड सराफ पेढी) चे प्रमुख संतोष बागडे, मिलिंद बागडे, अभिषेक बागडे, दिलीप अदापुरे, गणेश जोजारे, दिनेश लोळगे, रघुनाथ बागडे, सुधीर पोतदार, सचिन भंडारी, ए. बी. होनमाने आदी पदाधिकाऱ्यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला.
यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामती सराफ असोसिएशनचे आभार मानत राज्य सरकारच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाला बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, उपाध्यक्षा नुपूर शहा, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर आदी मान्यवर उपस्थित होते.