सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
वरंधा ता.भोर घाटातून पुणे कडून कोकणात जाताना सोमवार दि.२९ रोजी पहाटेच्या वेळी वरंधा घाटातील शिरगाव जवळ रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात एमएच १२ एचझेड ९२९९ ही चारचाकी गाडी पडल्याची घटना घडली.
या घटनेत राहुल विश्वास पानसरे (रा. मुंबई) यांचा मृत्यू झाला तर (अहिल्यानगर संगमनेर )येथील तरुण जखमी झाला असून त्याला महाड येथे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे माहिती भोर पोलिसांकडून देण्यात आली. वरंधा घाटातून कोकणात गणपतीपुळे येथे दर्शनासाठी जाताना जाताना शिरगाव ता.भोर हद्दीत रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यांच्या धूक्यामुळे अंदाज न आल्याने गाडी खड्ड्यात कोसळली. खड्ड्यात सध्याच्या पावसामुळे पाणी व मोठमोठे दगड गोटे असल्याने चारचाकी वाहनातील राहुल पानसरे याला जोरदार मार लागल्याने जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली तर दुसरा जखमी झाला. घटनेची माहिती कळताच स्थानिक अक्षय धुमाळ, भिमाजी पोळ, दत्तात्रय पोळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना अपघात ग्रस्तांना केली.तर भोर पोलीस निरीक्षक अण्णा पवार ,हवालदार अक्षय साळुंके,गणेश लडकत,सुनील चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून पुढील कार्यवाही केली.