Bhor Breaking l कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर भोर शहरासह ग्रामीण भागातून १७ जण हद्दपार : भोर पोलिसांची कारवाई

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
 कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भोर पोलिसांनी पाऊल उचलले असून शहरासह ग्रामीण भागातील १७ जणांवर हद्दपारची कारवाई केली. गणेश विसर्जन मंगळवार दि.२ व शनिवार दि.६ या दोन दिवसांसाठी पोलिसांनी शहर आणि गावातून १७ जणांना हद्दपार केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आण्णा पवार यांनी दिली.
    पोलीस निरीक्षक पुढे म्हणाले भोर पोलीस उपाधीक्षक यांनी बजावलेल्या आदेशानुसार १७ जणांवर हद्दपारची कारवाई केली गेली.पोलिसांचे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक आणि पोलीस ठाण्यातील साध्या वेशातील पोलिस या हद्दपार केलेल्या १७ जणांवर देखरेख ठेवणार आहेत.तर संबंधित व्यक्ती मंगळवार दि.२ व शनिवार दि.६ मिळून आल्यास त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.गणेश विसर्जनाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हे पाऊल उचलले असून याबाबतचे संबंधितांना नोटीस बजावणत आलेले आहे.या हद्दपारित भोर शहरातील ९ तर 
ग्रामीण भागातील ८ जणांचा समावेश आहे.
                                     
To Top