Bhor News l भोर, राजगड, मुळशीतील तांडावस्तीच्या विकासासाठी दीड कोटी मंजूर : मा. आमदार संग्राम थोपटे यांची माहिती

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-- - -
भोर : संतोष म्हस्के
भोर, राजगड आणि मुळशी तालुक्यातील तांडावस्ती विकासकामांना मोठा दिलासा मिळाला असून वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेअंतर्गत १ कोटी ४७ लक्ष ३४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.या निधीतून २९ विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली आसल्याचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले. 
       या विकास कामांच्या मंजुरीसाठी भोर-राजगड-मुळशीचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी विशेष प्रयत्न केले असून ग्रामीण भागातील तांडा वस्तीतील अंतर्गत रस्ते, नळ पाणीपुरवठा,पोहोच रस्ता, कॉन्क्रीट रस्ता व इतर सोयीसुविधा लवकरच होणार आहेत.माजी आमदार थोपटे विकासाचा ध्यास हाती धरून बहुतांशी विकास कामांना जलदगतीने मंजुरी घेत असल्याने त्यांचे जनतेतून अभिनंदन होत आहे.थोपटे पुढे म्हणाले जनतेचे प्रश्न सोडवणे हाच ध्यास मनी आहे.त्याप्रमाणे काम सुरू असून भाजपाच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी निधी मंजूर केला जात आहे.पुढील काळात भोर, राजगड, मुळशीचा पूर्णता विकास केला जाणार आहे.तर बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे.
Tags
To Top