Bhor Breaking l उत्रोली-वडगाव रस्त्यावर चारचाकीच्या धडकेत राजेवाडी येथील ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

सोमेश्वर रिपोर्टर live

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

भोर : संतोष म्हस्के

भोर – शिरवळ मार्गावरील उत्रोली - वडगाव हद्दीत मंगळवार (दि. १६) सायंकाळी दुचाकीला अज्ञात चारचाकी वाहनाने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

राजेवाडी (ता. खंडाळा) येथील अनिकेत अरुण शेडगे (वय ३१) हा तरुण भोर शहरातून आठवडे बाजार उरकून दुचाकीवरून घरी जात असताना ही दुर्घटना घडली. अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्यानंतर तेथून पसार झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

दरम्यान, भोर-शिंदेवाडी मार्गाचे काम सुरू असल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी माती व घसरगुंडी निर्माण झाली आहे. अशा स्थितीतही काही चारचाकी वाहने बेफिकीरपणे वेगाने चालवली जात असून छोट्या वाहनांना हुलकावणी दिली जाते. परिणामी अपघाताच्या घटना वाढीस लागल्या आहेत.

मागील आठवड्यातदेखील याच मार्गावर दुचाकी अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. अवघ्या आठवडाभरात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भोर पोलीस तपास करीत आहे. 

To Top