सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
आंबवडे खोऱ्यातील कर्नावड ता.भोर येथून पूर्वेकडील भागात जाणाऱ्या धोम - बलकवडी धरणाच्या डाव्या कालव्यात गाय चारायला घेऊन गेलेल्या कुडपणे वाडीतील तरुणाचा पाय घसरून कालव्यात पडल्याने वाहून गेल्याची घटना शुक्रवार दि .५ रोजी दुपारच्या वेळी घडली घडली.
वतरुणाचा शोध घेण्यासाठी स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचले असून कालव्याचे पाणी बंद करण्यात आले आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नावड येथील तरुण ओंकार (बाबू) शंकर कुडपणे वय - २१ गाय चारण्यासाठी कॅनॉलच्या शेजारून जात असताना अचानक गायसह कालव्यात पाय घसरून पडले.गाई पाण्याबरोबर वाहत गेली.काही अंतरावर गाई वाहून जात असल्याची शेतातून एका शेतकऱ्याने पाहिल्याने पळत जाऊन गाईला पाण्याबाहेर काढून जीवदान दिले.मात्र वाहते पाणी असल्याने तरुणाला पाण्यातून बाहेर निघता आले नाही.तरुण पाण्याबरोबर लांबपर्यंत वाहून गेला.या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला.स्थानिक नागरिक तसेच तरुण घटनास्थळी पोहोचले असून तरुणाचा घेतला काही वेळाने तरुणाचा मृतदेह कालव्यातून बाहेर काढला.कर्णावड गावावर तरुणाच्या मृत्यूने शोककळा पसरली असून परिसरात ओंकार कुडपणे याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.