Bhor News l भोर आगारात दुसऱ्या टप्प्यात पाच लालपरी होणार दाखल : मा. आमदार संग्राम थोपटे यांची माहिती

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम -----
भोर : संतोष म्हस्के
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे विभागाकडे भोर आगारासाठी वाढीव २० वाहनांची मागणी केली होती. या मागणीला यश मिळाले असून भोर आगारासाठी पहिल्या टप्प्यात ५ लालपरी एसटी बस दाखल झाल्या असून दुसऱ्या टप्प्यात ५ लालपरी एसटी वाहने प्राधान्याने दाखल होणार असल्याची माहिती माजी आमदार संग्राम थोपटे यांनी. 
       भोर एसटी आगारात बहुतांशी बसेस नादुरुस्त असल्याने वारंवार एसटी बसेस चालू प्रवासात रस्त्यावर थांबण्याचे प्रकार सुरू होते.यामुळे प्रवाशांना हा त्रास सहन करावा लागत होता.या पार्श्वभूमीवर नवीन बसेसची शासनाकडे मागणी करण्यात आली. या मागणीला प्रशासनाने मान्यता दिली असून लवकरच दुसऱ्या टप्प्यातील बसेस भोर आगारात दाखल होणार आहेत.भोर आगारात नवीन पाच बसेस मिळणार असल्याने पुढील काळात ग्रामीण भागात वारंवार दळणवळणाची होणारी गैरसोय थांबणार आहे.तर दुर्गम व डोंगरी भागात एस.टी. च्या फे-या नियमित देता येतील.शहरात येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांची एसटी बसेस अभावी होणारे नुकसान थांबणार असून विद्यार्थ्यांना वेळेत शाळेत पोहचता येणार आहे असेही माजी आमदार थोपटे म्हणाले.वाहनांच्या उपलब्धतेसाठी राज्याचे मुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विशेष सहकार्य लाभलेले आहे.
To Top