Bhor News l भाटघरला तरुणांकडून निर्माल्य..गणेश मूर्तीचे संकलन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर, खंडाळा तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या भाटघर ग्रामपंचायतने राबविलेल्या स्वच्छ व पर्यावरण पूरक गणेशोत्सवाला ग्रामस्थांकडून व भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी गावालगत धरणाच्या तिन्ही पानवट्यावर गणेश मूर्ती व निर्माल्य संकलन करण्यात आले.
      ग्रामस्थांनी व भाविकांनी गणेश मूर्तीचे मोठ्या भक्ती भावाने धरणाच्या पाण्यामध्ये तीन वेळा बुडवून संकलन केंद्रात सर्व मूर्ती जमा केल्या.ग्रामस्थांनी अतिशय भक्तीमय वातावरणात या उपक्रमाचा लाभ घेतला.यावेळी सरपंच सविता संजय वीर,उपसरपंच दगडू वीर सदस्य महेश भालेराव, शकुंतला तारू माजी सरपंच संजय वीर, पोलीस पाटील पांडुरंग भालेराव ,ग्रामसेवक राहुल शितोळे तसेच कर्मचारी महादेव तारू अमित कांबळे उपस्थित होते.या उपक्रमासाठी तरुणांचे मोलाचे सहकार्य लाभले असून
उपक्रमाचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
Tags
To Top