सध्या वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार वाढले आहेत. सर्दी, खोकला, ताप, थंडी, पित्त, पोटदुखी, अंगदुखी यांसारख्या सामान्य आजारांनी नागरिक त्रस्त आहेत. अशा वेळी गावात तात्काळ उपचार मिळावेत यासाठी सुनिता भिलारे यांनी हा उपक्रम हाती घेतला. प्रथमोपचार पेट्यांमध्ये सामान्य आजारांवरील औषधांसोबतच शेतात किंवा कामावर असताना अपघाताने झालेल्या जखमांवर त्वरित उपचार करता यावेत यासाठी ड्रेसिंग मटेरियल व औषधी मलम देखील ठेवण्यात आले आहे.
“माझे गाव, माझी जबाबदारी” या संकल्पनेतून नागरिकांच्या आरोग्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगून सुनिता भिलारे म्हणाल्या की, गावकऱ्यांना आरोग्याच्या अडचणींवर तात्काळ मदत मिळावी, यासाठी हा छोटा उपक्रम राबवला आहे. सर्वसामान्यांनी याचा उपयोग करून घ्यावा.
या उपक्रमाचे संपूर्ण वीसगाव खोऱ्यातून कौतुक होत आहे. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा सहज उपलब्ध नसल्याने अशा उपक्रमामुळे तातडीच्या परिस्थितीत ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.
कार्यक्रमावेळी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यामध्ये सोनाली महेश पोळ, वैशाली सतीश मांढरे, संगीता पोपट भिलारे, संगीता मारुती भिलारे आदींचा सहभाग होता. गावातील आरोग्य जपण्यासाठी ग्रामपंचायत सदस्याचा असा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरतो आहे.