सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
नुकताच गणेशोत्सव मोठ्या आनंदी वातावरणात पार पडला असून भोर शहरात सातव्या व दहाव्या दिवशी गणेशभक्तांनी लाडक्या बाप्पाला राजवाड्यातील शनिघाटाशेजारील नीरा नदी पात्रात विर्सजित केले गेले.नदीला पाणी जास्त असल्याने हजारो गणेश मूर्ती पाण्यात खोलवर बुडाल्या होत्या. मात्र सद्या नदी पात्रातील पाणी कमी झाल्याने विसर्जन केलेल्या गणेशमूर्ती पूर्णता उघड्यावर पडल्या होत्या. सामाजिक बांधिलकी जपित शहरातील श्रीपतीनगर येथील अष्टविनायक तरुण मंडळाच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन उघड्या पडलेल्या गणेशमूर्ती गोळा करून पुन्हा मूर्ती नदीच्या खोल पाण्यात विसर्जित केल्या.
विघ्नहर्ता गणेशाचा गेली काही दिवसांपूर्वी गणेशोत्सव मोठ्या आनंदी वातावरणात साजरा झाला.दहा दिवस मनोभावे सेवा करत आपल्या लाडक्या बाप्पाला गणेशभक्तांनी विसर्जन करत निरोप दिला.काठोकाठ भरलेल्या नदीत गणेशभक्तांनी गणेशमूर्तीचे विसर्जन केले होते.परंतु सध्या येथील नदीतील पाणी झपाट्याने कमी झाल्याने काठोकाठ भरलेले पाणी खाली जाऊ लागले आहे.त्यामुळे विसर्जन केलेल्या गणेशमूर्ती नदीकाठी उघड्यावर पडलेल्या अवस्थेत होत्या.मंडळाच्या तरुणांनी पुढे येत शनिवार दि.१३ सकाळपासूनच पाण्यात साखळी करून एकत्रितपणे एक एक मूर्ती अशा दोनशेहून अधिक मुर्ती नदीपात्राच्या मध्यभागी खोल पाण्यात विसर्जित केल्या.यावेळी ओंकार बहिरट, आदर्श येलगुडे, हर्ष खामकर, निसर्गराज मादगुडे, सार्थक खुटवड, अथर्व जेधे, निनाद पवार, श्रवण शिंदे, तुषार राठोड,संकेत खोपडे व सह्याद्री सर्च अँड रेस्क्यू फोर्सचे सचिन देशमुख, सुनिल सावंत,अक्षय वीर,सोहम पवार आदी तरूण उपस्थित होते.युवकांनी केलेल्या सामाजिक कामांचे तालुक्यातून कौतुक होत आहे.
