सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे.त्यानिमित्त भोर शहरातील श्री वाघजाईदेवी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आली.
यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने दक्षिण भागातील कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या मार्फत सेवाभावी उपक्रम करण्यात आला.श्री वाघजाई देवीचे दर्शन घेऊन देवीच्या नावाचा जयघोष करण्यात आला .त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी भारत भरात केलेल्या कार्याची माहिती व विकास कामांच्या योजना माहिती देण्यात आली. यानंतर श्री वाघाजाईदेवी मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली.यावेळी पुणे जिल्हा दक्षिण सरचिटणीस बाळासाहेब गरुड, जिल्हा उपाध्यक्ष जीवन कोंडे,माजी जिल्हा चिटणीस सचिन मांडके, उत्तर मंडलचे अध्यक्ष संतोष धावले , भोर तालुका दक्षिण मंडलचे अध्यक्ष रवींद्र कंक, उपाध्यक्ष समीर घोडेकर,कालिदास भिलारे, शिवाजी थोपटे, चिटणीस राजेश कुडले,प्रियांका तामकर,भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सुरज चव्हाण,युवा नेते रोहन भोसले, मंदिर देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक आप्पा राऊत व सचिव महेश गुजराती आदी उपस्थित होते.