पुरंदर l निधन वार्ता l बेलसर येथील प्रगतशील शेतकरी ह.भ.प. महादेव गरुड यांचे निधन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
बेलसर (ता.पुरंदर) येथील प्रगतशील शेतकरी व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले ह.भ.प. महादेव रंगनाथ गरुड (वय ८३ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते बेलसर विविध कार्यकारी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन होते. त्यांच्या निधनाने बेलसर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
     त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना, जावई नातवंडे, परतुंडे असा मोठा परिवार आहे. 
     गुरोळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक नेते राजेंद्र गरुड आणि सिरम कंपनीचे सेवानिवृत्त अधिकारी अशोक गरुड यांचे ते वडील होत. तसेच जिजा अ‍ॅग्रो-टुरिझमचे प्रोपायटर सूरज गरुड व देवांशू गरुड यांचे ते आजोबा होत.

To Top