Bhor News l काळुबाई देवीला जिल्ह्याभरातून हजारो वाहनांची वर्दळ : चौपाटी चौकात ट्राफिक जाम

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यातील भाविक भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या मांढरदेवी गडावरील काळुबाई देवीच्या नवरात्र उत्सवातील दुसऱ्या दिवशीच्या दर्शनासाठी हजारो वाहनांची रिसेल झाल्याने गडावर भाविकांची मोठी गर्दी केली होती.
     पुणे-सातारा महामार्गापासून भोर - आंबाडखिंड घाटमार्गे काळुबाई देवीला जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने वाहनचालक भोरमार्गेचा प्रवास पसंत करीत असतात.सोमवार दि.२२ रोजी घटस्थापना होऊन मंगळवार देवीचा वार तसेच नवरात्र उत्सवातील दुसरी माळ असल्याने भावीक भक्तांची गर्दी झाली. मंगळवार दि.२३ रोजी पहाटेपासूनच भोर शहरापासून आंबाडखिंड घाटातून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यातच रिमझिम पाऊस सुरू असल्याने तसेच रस्त्याचे ठिकठिकाणी नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने वाहनांना ये-जा करण्यासाठी अडथळा निर्माण होत होता.दरम्यान वाहने काही वेळ एका जागेवर थांबून राहत असल्याचे चित्र होते.बहुतांशी सिमेंटचा रस्ता पूर्ण झाल्याने दुचाकी,चारचाकी वाहने वेगाची मर्यादा न राखता सुसाट सुरू होती.तर भोर शहरातील शिवतीर्थ चौपाटी येथे अरुंद रस्ता असल्याने काही वेळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.तात्काळ भोर वाहतूक पोलिसांनी हे जबाबदारपणे वाहने चालून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून रस्ता मोकळा केला. 
To Top