Bhor News l भोरच्या जवाहर कुस्ती संकुलाच्या मुलींचा जिल्ह्यात डंका : सहा मुलींची विभागासाठी निवड

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
महिला मल्लांना तयार करण्यासाठी अग्रगण्य ठरलेल्या भोर येथील जवाहर कुस्ती संकुलातील ६ महिला मल्लांनी जिल्हा पातळीवर विजेतेपद पटकावून विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे. तर आणखी ५ महिला पैलवानांनी उत्तेजनार्थ मेडल जिंकत संकुलाचे नाव उंचावले.

मागील महिन्यात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत ११ मुली जिल्हा पातळीवरील स्पर्धेसाठी पात्र ठरल्या होत्या. त्यानंतर २५ सप्टेंबर रोजी इंदापूर व सोमेश्वर येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत

  • १९ वर्षे वयोगट अंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेतअर्पिता गोळे, पूर्वा शिवतरे
  • शालेय कुस्ती स्पर्धेतअनुष्का खोपडे, कादंबरी शेटे, वैष्णवी मरगजे, सई भेलके

यांनी प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. तर दिशा खोपडे (द्वितीय), दर्शना म्हस्के, धनश्री आवारे, सई जांभळे व जानकी भालेघरे (तृतीय) यांनी उत्तेजनार्थ पदक पटकावले.

या यशामुळे जवाहर कुस्ती संकुल महिला कुस्ती प्रशिक्षणासाठी अव्वल ठरले असून विजेत्या मल्ला व प्रशिक्षक सुनील शेटे यांचे तालुक्यात कौतुक होत आहे.

स्पर्धेस वेळी पै. शशिकांत खोपडे, सागर शेटे, संजय भेलके, ॲड. सचिन जांभळे, संतोष म्हस्के, आबा भालेघरे, धनंजय आवारे आदी मान्यवर उपस्थित होते.

To Top