Bhor News l डॉ. आंबेडकर कार्यगौरव पुरस्कार...! वसंत साळवे, डॉ. प्रदीप पाटील यांना जाहीर

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर येथील फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळाच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर कार्यगौरव पुरस्कार जाहीर झाले असून राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार पुण्यातील ज्येष्ठ आंबेडकरी नेते व कार्यकर्ते वसंत साळवे यांना तर तालुकास्तरीय पुरस्कार प्रसिद्ध वैद्यकीय सेवेत कार्यरत असणारे व आंबेडकरी विचारांचा वसा वारसा चालवणारे डॉ.प्रदीप पाटील यांना जाहीर झाला आहे अशी माहिती फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. रोहिदास जाधव यांनी दिली.
            वसंत साळवे यांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वाड्या वस्त्यांर जाऊन निस्वार्थ भावनेने आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्याचं काम केलं आहे.विविधमोर्चे,आंदोलनं, उपोषणनं,लॉंंगमार्च,धरणं यात महाराष्ट्रानं त्यांना कायम पाहिलं आहे.त्यांनी आंबेडकरी चळवळ हेच आपलं जीवन सार्थक मानलं आहे.पुणे मनपाच्या  शिक्षण मंडळाचे अध्यक्ष असताना शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले.महाराष्ट्र आणि त्याच्या परिघाबाहेर वसंत साळवे यांच्या कार्याची व्याप्ती पसरलेली आहे.डॉ.प्रदीप पाटील हे वैद्यकिय क्षेत्रातील प्रसिद्ध सेवाव्रती असून ते भोर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आहेत.तसेच शिव - फुले -शाहू -आंबेडकरी विचारांचे प्रचार व प्रसारक
आहेत.संत साहित्य व फुले शाहू आंबेडकरी विचारधारा यांच्या समन्वयातून समाजप्रबोधनाची मोहिम गेल्या अनेक वर्षांपासून ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चालवतात‌.यावर त्यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित झाले असून भोर येथील फुले शाहू आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलनाच्या आयोजनात डॉ.पाटील यांचे योगदान अतुलनीय राहिले आहे.राष्ट्रीय पुरस्कारासाठी रोख रक्कम 
पंचवीस हजार तर तालुका स्तरीय पुरस्कारासाठी रुपये दहा हजार, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या
पुरस्काराचे स्वरूप असून डिसेंबर २०२५ हे पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान केले जाणार आहेत..
To Top