सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर-मुळशी-राजगड विधानसभा मतदारसंघातील विकासकामे वेगाने व्हावीत व वन विभागाच्या अडीअडचणीमुळे साधारण ५५ ते ६० गावांमध्ये प्रलंबित असलेली कामे त्वरित मार्गी लागावीत या उद्देशाने पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत भोर येथे विशेष बैठक संपन्न झाली.
या बैठकीत राजगड, रायरेश्वर, बनेश्वर, मढे घाट रस्ता घोल - कुंबे रस्ता, देवघर यांसह ५०-६० विविध गावच्या विकास कामांच्या बाबतीत सविस्तर चर्चा झाली. ग्रामविकासाशी निगडित प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील व मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीस नवे बळ मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, राजगड राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष किरण राऊत, जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रकांत बाठे,माजी उपसभापती विक्रम खुटवड,सहाय्यक वनसंरक्षक शितल राठोड,वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत, राजगड (वेल्हे) वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे, नसरापूर वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण, पौड वन परिमंडळ अधिकारी नंदकुमार शेलार यांच्यासह मतदारसंघातील विविध गावचे आजी-माजी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.