Bhor News l विकास कामांच्या श्रेयवादावरून आजी-माजी आमदार आमने सामने..! खोटे-नाटे आरोप थांबवा..अन्यथा जशास तसे उत्तर देऊ..संग्राम थोपटे यांची आमदार मांडेकरांवर टीका

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
मुख्यमंत्री यांनी मंजूर केलेल्या विकास निधीच्या जोरावर भोर तालुक्यात भाजपाची नियोजित विकास कामे सुरू आहेत.याची मिरची विरोधकांना झोंबत आहे.राजकीय अपघातातून आमदार झालेले जनतेची दिशाभूल करीत आहेत.आम्ही जनतेचा कौल स्वीकारला असला तरी जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत.आम्हीच आणलेल्या विकास कामांची भूमिपूजने करून विरोधक श्रेय लाटत आहेत.विरोधकांनी व्यक्तीदोषातून खोटे-नाटे आरोप थांबवा,अन्यथा जशास तसे उत्तर देऊ असा टोला माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आमदार शंकर मांडेकर यांना लगावला. 
            रायरेश्वर डोंगरी विकास परिषद येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार संग्राम थोपटे रविवार दि.७ रोजी बोलत होते.यावेळी विठ्ठल आवाळे,पोपट सुके,जीवन कोंडे, संतोष धावले,उत्तम थोपटे,रवींद्र कंक, पल्लवी फडणीस, सुभाष कोंढाळकर, गणेश पवार ,अमित सागळे
अभिषेक येलगुडे ,अतुल किंद्रे,संतोष केळकर, दादासो खोपडे, चंद्रकांत मळेकर, विजय शिरवले आदींसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.थोपटे पुढे म्हणाले स्वतः तीन वेळा सत्तेच्या लालचीपोटी पक्ष बदलणाऱ्यांनी आम्हाला आम्हाला तालुक्याच्या विकासाचे धडे शिकवू नयेत.संविधानात मला अधिकार असून लोकशाही त्याला वाचा फोडण्याचे काम केले जाते याची विद्यमान आमदारांना कल्पना नसावी.पत्रकार परिषदेत शेजारच्या गाईडचे प्राँन्टींग ऐकून बोलण्यापेक्षा स्वतः विकासाबाबत ठामपणे बोलावे.काय बोलता ही जनतेला कळत नाही.येऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रात्ररात्र कशासाठी फिरता.आम्ही पक्ष बदल केला आहे मान्य आहे.मात्र मागील पंचवार्षिकच्या विकास कामांच्या तोडीस तोड देऊन सद्या भाजपाच्या माध्यमातून  विकास कामांना कोट्यवधींचा निधी खेचून आणत आहोत.चंगल्याला चांगले म्हणणारे आम्ही आहोत.तुम्ही तुमची पातळी राखा,अन्यथा आम्ही जशास तसे उत्तर देऊ.
Tags
To Top