Bhor News l भोर आगारात ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा : कर्मचाऱ्यांसह प्रवाशी करतायेत पाणीटंचाईचा सामना

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के 
राज्य परिवहन महामंडळाच्या भोर एसटी आगाराच्या डेपोमध्ये नगरपरिषदेची पाणीपुरवठा करणारी अर्धा इंची पाण्याचे वितरण पाईप बंद केल्याने डेपोला होणारा पाणीपुरवठा आठ दिवसांपासून बंद आहे. यामुळे डेपोतील कर्मचाऱ्यांना ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून पिण्याचे पाणी,बस धुणे, स्वच्छतागृह आदी पाण्याच्या वापरासाठी भोर आगाराला टँकर सुरू करावा लागला आहे.
      भोर डेपोतील  ४०० कर्मचऱ्यांसह शेकडो प्रवाशांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून पाच हजार लिटर टँकरच्या साहाय्याने दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी टँकरच्या तर पंजाब पाण्यामुळे स्वच्छतागृह तसेच बस धुण्यासाठी पाणी कमी पडत असल्याने एसटी डेपोत दुर्गंधी पसरली असल्याचे चित्र आहे.पाण्याची कमतरता एसटी डेपोत भासत असल्याने नगरपरिषदेकडून एक इंची नळाचे कोटेशन घेऊन प्रस्ताव महामंडळाच्या विभागीय स्तरावर पाठवला आहे.मंजुरी आल्यानंतर डेपोतील पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.सध्या दिवसाआड टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे असे आगार व्यवस्थापक रमेश मंता यांनी सांगितले.तर ५ हजार ६०० रुपये व दीड हजार रुपये नगरपरिषदेची पाणीपट्टी भरण्यात आलेली आहे.तरीही दोन्ही वाहिनीवरून पाणीपुरवठा सुरळीत नसल्याचे आगाराकडून सांगण्यात आले.भोर डेपोसाठी नगरपरिषदेकडून अर्धा इंचाच्या दोन नलिकेतून पाणीपुरवठा केला जात आहे. या दोन्ही नलिका वितरण नलिकेवरून जोडणे आवश्यक असताना त्यातील एक नलिका मुख्य जलवाहिनीला जोडले असल्याचे लक्षात आले. त्यामुळे परवानगी नसलेल्या मुख्य वाहिनीवरून घेतलेली जोड तोडण्यात आले आहे असे नगरपरिषदेकडून सांगण्यात आले.
       डेपोतील पाण्याचे दोन्ही जोड हे वितरण नलिकेवरून असणे आवश्यक होते.परंतु त्यातील एक जोड परवानगी नसलेल्या मुख्य वाहिनीवरून सुरू होता.त्यामुळे ते जोड बंद केले आहेत. तोडलेले मुख्य वाहिनीचे जोड वितरण नलिकेला जोडण्याचे काम सुरू आहे असे नगरपरिषद मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी सांगितले.

            
To Top