सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाणेवाडी ( मळशी ) येथील ज्योतिबा वि. का सोसायटी लि. मळशी-वाणेवाडी या संस्थेचा सन २०२४-२५ साला करता १५% लाभांश जाहीर केला आहे. यापैकी १० टक्के रक्कम रोख स्वरूपात तर ५ टक्के इमारत बांधकामासाठी कपात करून घेण्याचा ठराव वार्षिक सभेत करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मणराव काकडे यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक साधारण सभा दि. २३ सप्टेंबर रोजी पार पडली. वार्षिक अहवालाचे वाचन सचिव मनोज जगताप यांनी केले यावेळी बोलताना अध्यक्ष काकडे यांनी सांगितले की संस्थेची चांगल्या प्रकारे प्रगती होत असून संस्थेस ऑडिट वर्ग "ब" मिळालेला असून संस्थेचे भांडवल २७ लाख असून गंगाजळी व इमारत निधी आज अखेर १८ लाख आहे. बँक कर्ज देणे रुपये ५ कोटी ३८ लाख असून सभासद येणे कर्ज रुपये ५ कोटी ७८ लाख रुपये एवढे आहे.
यावेळी शहाजी जगताप, तानाजी जगताप, दिलीप जगताप, बारामती इंदापूर सुपरवायझिंग युनियनचे अध्यक्ष धन्यकुमार जगताप, अविनाश जगताप, रवींद्र जगताप, तानाजी जगताप, चंद्रकांत काकडे, दत्तात्रेय जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. सचिव मनोज जगताप यांनी आभार मानले. फोटोओळ : वाणेवाडी-मळशी येथील जोतिबा सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.