सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : ओंकार साखरे
गांधीनगर ( मेढा ) येथिल भैरवनाथ गणेशत्सोव मंडळाने आयोजित केलेल्या श्री सत्यनाराण पुजेला उपस्थिती दाखवित ईच्छापूर्ती गणरायाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दर्शन घेतले.
यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे , प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, भाजपा तालुकाध्यक्ष मारुती (बापू) चिकणे आदी उपस्थित होते.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले मंडळाचे वतीने प्रतिवर्षी अन्नदानाचे काम सुरु असल्याचे समाधान वाटत असून सामाजिक भावना या उपक्रमातुन जतन होताना दिसतात.
यावेळी त्यांनी गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या. तसेच एका छोट्या वस्तीतील गणपतीस सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भेट दिल्याने गांधीनगर येथील गणेश भक्तांना मोठा आनंद झाला. गांधीनगरच्या ईच्छापूर्ती गणरायाचे मंत्र्यांनी येवु दर्शन घेण्याचा पहिलाच प्रसंग असल्याने सगळे नागरीक भारावून गेले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.