Jawali News l मेढा नगरपंचायतीचे नुतन मुख्याधिकारी अजिंक्य पाटीलांनी स्विकारला पदभार

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
जावली तालुक्याची राजधानी असलेल्या मेढा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पराग कोडगुले यांची सातारा येथे बदली झाल्याने नवे मुख्याधिकारी म्हणून अजिंक्य पाटील यांनी पदभार स्वीकारला असुन  नगर पंचायती कर्मचाऱ्याचे वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
          मेढा नगर पंचायतीचे तत्कालीन मुख्याधिकारी पराग कोडगुले यांनी मेढा नगरीच्या वैभवामध्ये भर टाकण्याचे महत्वपूर्ण काम करताना नगरपंचायतीच्या नतुन ईमारतीचे कामाचा शुभारंभ करून ती पुर्णत्वाकडे नेण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न केला. अनेक अडचणींचा सामना करताना ईमारत उभी करण्यासाठी हार मानली नाही आणि ती उभी केल्याने मेढ्याच्या वैभवात एका नविन शासकीय ईमारतीची भर पडली आहे.
          तसेच अनेक प्रभागात  मुख्याधिकारी पराग कोडगुले यांनी रस्ते, गटरे आदी चांगल्या दर्जाची कामे करून आपल्या अडीच वर्षाच्या काळात नावलौकीक मिळवला.  मेढा नगरीसह शेजारील गावांना आवश्यक असणारा स्मशान भुमीच्या जागेचा प्रश्न पाटबंधारे विभागामार्फत मार्गी लावण्यात यश मिळविले होते आणि तो ही प्रश्न  पूर्ण करण्याचे त्यांचे स्वप्न होते.
          नुतन मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेले अजिंक्य पाटील यांचे कडून स्मशान भुमी सह घनघचरा व्यवस्थापन आदी विकासात्मक प्रश्न ते सहजपणे सोडवतील अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली जात आहे. सातारा येथिल कार्यकालात मुखाधिकारी अजिंक्य पाटील यांनी चांगले काम केल्याचा नावलौकीत असल्याने मेढा नगरीचे प्रश्न सोडविण्याचा प्रत्यत्न करतील.
         मेढा नगरपंचायतीच्या वतीने लेखाधिकारी रोशन गायकवाड यांनी मुख्याधिकारी अजिंक्य पाटील यांचे स्वागत केले. यावेळी अधिक्षिका हिमाली कुलकर्णी, लेखाधिकारी अक्षय चन्ने, अभियंता राऊत, स्वच्छता निरीक्षक स्वरूप अहिवळे, अभियंता अभिजित ढाणक, समन्वयक स्वप्नील देशमुख, लिपीक विकास जवळ, सचिन करंजेकर, आशिष कुंभार , शुभंम जवळ, राजु पुजारी आदी यावेळी उपस्थित होते.
 
To Top