सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : प्रतिनिधी
महाराष्ट्रभर सद्या शालेय क्रिडा स्पर्धा चालु आहेत. यामध्ये विशेषता कुस्ती स्पर्धेत वय चोरीचे प्रकार खुप वाढले आहेत. त्यामुळे प्रामाणिक व नियमांत खेळनार्या स्पर्धकांवर मोठा अन्याय होताना दिसत आहे यासाठी शालेय क्रिडा स्पर्धांमध्ये बोगस स्पर्धकांना आळा घालावा अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करनार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे हभप प्रविण महाराज शेलार यांनी माहिती दिली आहे.
ते पत्रकात म्हणातात की, कला व क्रिडा या दोनही महाराष्ट्राच्या उज्वल परंपरा आहेत. वारकरी संप्रदायामध्ये ज्याप्रमाणे व्यसनमुक्त,सुसंस्कृत व सदाचारी तरुण वर्ग पहायला मीळतो त्याच प्रमाने क्रिडा क्षेत्रातील तरुण हा महाराष्ट्राची शान आहे हे आजपर्यंत या महाराष्ट्रातील महान पैलवानानी व विविध क्षेत्रातील खेळाडुंनी आपल्या कृतीतुन सिद्ध केले आहे आणि त्यामुळेच आमच्यासारखे लाखो क्रिडाप्रेमी कुस्तीवर व विशेषता पैलवानावर जीवापाड प्रेम करतात. त्यांच्या भावनांचा आदर राखुन शासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी व बोगस खेळाडुंना आळा घालावा.
पत्रकात पुढे ही असे म्हटले आहे की, खेळाडुच्या कागदपत्रांमध्ये शालेय क्रिडा महासंघ (SGFI) व राज्य शासनाच्या GR नुसार जन्मप्रमाणपत्र,आधारकार्ड,इयत्ता १ली प्रवेशाची शाळेची नोंदवही अशा या तीनही कागदपत्रांच्या सत्यप्रती अनिवार्य केलेल्या आहेत.पण यामद्धे प्रचंड भोंगळ कारभार दिसुन येत आहे त्यासाठी आधार कार्डची गुगल हिस्ट्री काढ़ुन त्याची सत्यप्रत जोडने बंधनकारक करावे ही विनंती.अन्यथा होऊ घातलेल्या शासकीय क्रीड़ा स्पर्धांवर नाराजी व्यक्त करुन मोठे आंदोलन उभे करू.असा इशारा वारकरी महामंडळ महाराष्ट्र राज्याचे जिल्हाध्यक्ष व क्रीडाप्रेमी हभप प्रविण महाराज शेलार यानी दिला आहे.