सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्याच्या पश्चिम भागातील भिवरी पंचक्रोशीत अध्यात्मिक,सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या
चतुर्मुख भैरवनाथ पंचक्रोशी प्रासादिक दिंडी सोहळ्याच्या अध्यक्षपदी संभाजी सिताराम नाटकर व उपाध्यक्षपदी एकनाथ निवृत्ती कटके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्ष नामदेव कुंजीर व उपाध्यक्ष पोपटराव दळवी यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागी या निवडी करण्यात आल्या.
चतुर्मुख भैरवनाथ प्रासादिक दिंडी सोहळा कार्यकारीणी पुढीलप्रमाणे -
खजिनदार - मारुती भैरू कटके , कार्याध्यक्ष जगन्नाथ देवराम कटके ,सचिव - ज्ञानेश्वर गणपत घारे,संचालक दत्तात्रेय कोंडीबा कटके, नामदेव बबन कुंजीर, शहाजी बाबूराव लोणकर ,नामदेव महादेव कटके , पोपटराव दामोदर दळवी,बबन परशुराम कटके, संपत यादव घिसरे , दत्तात्रय शंकर काळे, भिकाजी निवृत्ती कटके, मारुती नामदेव घिसरे,पोपटराव दादासाहेब कटके,पंढरीनाथ तुकाराम गायकवाड, नारायण आश्रू कटके, प्रदिप बाजीराव नाटकर ,सौ रंजना तुकाराम कटके, सौ शिवगंगा सुभाष कटके
सर्व नवनिर्वाचीत कार्यकारणीचा सत्कार भिवरी येथील भैरवनाथ मंदिरात करण्यात आला. यावेळी भिवरी गावातील ग्रामपंचायत,विविध संस्था, पक्ष, मंडळे यांचे पदाधिकारी, गाव कारभारी उपस्थित होते.
भागवत संप्रदाय प्रसाराचे काम सर्वांना विश्वासात,मदतीचा हात देवून करणार आहे. तसेच लोकदैवत विठुरायाच्या भक्तीचा व संतांच्या विचाराच्या प्रचार प्रसारासाठी सातत्यपूर्ण योगदान देणार असल्याचे निवडीनंतर अध्यक्ष संभाजी नाटकर , उपाध्यक्ष एकनाथ कटके, खजिनदार मारुती कटके, कार्याध्यक्ष जगन्नाथ कटके, सचिव ज्ञानेश्वर घारे व सर्व संचालक मंडळ यांनी सांगितले.