Purandar News l नीरा पोलीस स्टेशनच्या शेजारूनच चोरट्याचा दुचाकीवर डल्ला : मागील दोन वर्षात २५ ते ३० दुचाकी चोरीला

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : प्रशांत म. ढावरे
नीरा पोलीस दूरक्षेत्राच्या शेजारीच मोटारसायकल चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, या घटनेनंतर पोलिसांनी तक्रारदाराकडून केवळ अर्ज घेऊन थातूरमातूर कारवाई केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
          तक्रारदार राजेंद्र महादेव खरात (रा. पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा) हे दि. ६ सप्टेंबर रोजी दुपारी वैयक्तिक कामानिमित्त नीरा येथे आले होते. दुपारी साधारण तीनच्या सुमारास त्यांनी आपली दुचाकी (क्र. MH-11-CF-2779) नीरा पोलीस दूरक्षेत्राच्या लगत असलेल्या एका दुकानासमोर उभी केली होती.
मात्र साधारण सव्वा तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्याने ती मोटारसायकल चोरून नेली. घटनेच्या ठिकाणाजवळच पोलीस दूरक्षेत्र असतानाही चोरट्याने दुचाकी सहजपणे लंपास केल्यामुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक नागरिकांत या घटनेमुळे संतापाची लाट उसळली असून पोलिसांच्या निष्क्रियतेवरही टीकेची झोड उठत आहे.
To Top