सुपे परगणा l जनाईत परिसरातील सर्व तलाव सामाविष्ठ करा : शेतकरी संघर्ष कृती समितीची मागणी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
सुपे ( ता. बारामती ) परगण्याला वरदान ठरलेल्या शासनाच्या जनाई उपसा सिंचन योजनेअंतर्गत परिसरातील सर्व तलाव समाविष्ट करण्याची मागणी शेतकरी संघर्ष कृती समितीने केली आहे. 
         सुपे येथील माऊली मंदिर या ठिकाणी शेतकरी संर्घष कृती समितीच्या वतीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत जनाई योजनेअंतर्गत येणारे छोटे मोठे तलाव समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली. तसेच पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांना एक आक्टोंबर ला जनाई योजनेतून पाणी सोडण्यात यावे. तसेच लवकरात लवकर बंदिस्त पाईपलाईन करून राहिलेल्या क्षेत्राच्या भूसंपादनाची रक्कम त्वरीत शेतकऱ्यांना मिळावी आदी मागण्या या बैठकीत घेण्यात आल्या. 
          याप्रसंगी कृती समितीचे अध्यक्ष पोपट खैरे, माजी पंचायत समिती सभापती पोपटराव पानसरे, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कौले, विजयराव खैरे, संतोष काटे, प्रकाश काळखैरे, भानुदास बोरकर, सचिन साळुंखे, किरण खैरे, राजेंद्र मचाले, गणेश चांदगुडे, ज्ञानदेव चांदगुडे, राजेंद्र बोरकर, दिलीप खोमणे आदीसह सुपे, कारखेल, कोळोली, खोपवाडी, कुतवळवाडी, भोंडवेवाडी चांदगुडेवाडी मांगोबाचीवाडी, खंडूखैरेवाडी, काऱ्हाटी,  पानसरेवाडी, बोरकरवाडी, आंबी खुर्द, कौलेवाडी, वढाणे, राजाबाग आदी परिसरातील
सभासद शेतकरी उपस्थित होते. 
          ...............................
To Top