सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रतिनिधी
फलटण तालुक्यातील तरडगाव येथील सरकारी दवाखान्याच्या समोरील पुलावर रविवारी (दि. ७ सप्टेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात नांदल गावातील नवनाथ जगन्नाथ कोळेकर (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला.
/नवनाथ कोळेकर हे आपल्या हिरो होंडा स्प्लेंडर (क्र. MH 11 BF 1871) मोटारसायकलवरून कामावरून घरी जात असताना मागून आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा उजवा पाय गंभीर जखमी झाला व प्रचंड रक्तस्राव झाला. तसेच शरीरावर इतरही जखमा झाल्या.
अपघातानंतर जखमीला मदत न करता वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. उपचाराअभावी नवनाथ कोळेकर यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर मृताचा भाऊ मच्छिंद्र जगन्नाथ कोळेकर यांनी लोणंद पोलिस स्टेशनला फिर्याद दिली असून, अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.फौ. येळे करत आहेत.