पुरंदर l निधन वार्ता l भिवरी येथील मंगल सावंत यांचे निधन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
भिवरी (ता.पुरंदर) येथील मंगल रामदास सावंत (वय ६६) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
     त्यांच्या मागे पती, दीर , नणंद, भावजय,एक मुलगा, तीन मुली, पुतण्या, भाचे, सून,जावई ,नातवंडे असा परिवार आहे. 
        वीर नेताजी तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष रामदास सावंत यांच्या त्या पत्नी होत. उद्योजक आप्पासाहेब सावंत ,गृहिणी सविता काकडे ,माया सूर्यवंशी, मनिषा खवले यांच्या त्या मातोश्री होत. वैष्णवी डेव्हलपर्सचे डायरेक्टर नवनाथ कटके व आदर्श शिक्षक भाऊसाहेब जगताप, उद्योजक संतोष जगताप यांच्या त्या मामी होत. रिक्षा व्यावसायिक संजय सावंत ,गृहिणी सुरेखा बालवडकर ,सुवर्णा जरांडे यांच्या त्या चुलती होत.
To Top