सोमेश्वर रिपोर्टर टीम------
फलटण : गणेश पवार
रयत क्रांती संघटनेच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्र भर शेतकारींच्या विविध मागण्यांसाठी तहासिल कार्यालयावर रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली व रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन केले होते.
या मोर्चा मधील प्रमुख मागण्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने संकरित जर्सी होस्टन गायींचे गोटे वाचवायचे असतील तर गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा होणे काळाची गरज आहे या कायद्याच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या गोठ्यामधील गाभ न धरणाऱ्या गाई म्हशी वयस्कर गाई विविध कारणांमुळे दूध न देणाऱ्या गाई अशा गाईंचे संगोपन करणं तसेच ज्या जर्सी होस्टन गाई व्यायल्यानंतर ज्यांना खोंड होत आहेत अशा खोडांचा गंभीर प्रश्न दूध धंद्यातील दराच्या चढ-उतारामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यापुढे निर्माण झाला आहे यामुळे जर्सी गाईच्या गोठ्यांचे मालक दूध व्यवसायाच्या अनुषंगाने आर्थिक संकटात सापडले आहेत त्यांना न्याय देण्यासाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने आमदार श्री सदाभाऊ खोत साहेब यांनी अतिशय प्रखर भूमिका घेतली असून या भूमिकेचे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे ज्या शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये अशा दूध न देणाऱ्या तीन चार गाई आहेत तो शेतकरी पूर्णतः उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे त्याच्या या गाई तात्काळ जर विकल्या गेल्या नाहीत तर तो शेतकरी या गाईच्या चारा पशुखाद्य यामुळे तोट्यात जाणार आहे त्याचा गोठा संपणार आहे तो या व्यवसायातून बाजूला होणार असून त्याच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहणार आहे त्यामुळे अशा गोवंश हत्याबंदी सारख्या शेतकरी विरोधी कायद्यांमध्ये सुधारणा करणे काळाची गरज आहे तसेच या गोवंश हत्याबंदी कायद्याच्या मुळे त्रस्त झालेला महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी आमदार सदाभाऊ खोत यांनी या कायद्याच्या विरोधामध्ये घेतलेल्या प्रखर भूमिकेमुळे कधी नव्हे तो एकवटल्याच चित्र संपूर्ण महाराष्ट्रात पाहावयास मिळत आहे याचा परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्याच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने त्यामध्ये प्रामुख्याने दूध दराचा प्रश्न हा प्रति लिटर गायीच्या दुधाला चाळीस रुपये असावा ही मागणी जोर धरू लागली आहे या सर्व मागण्या व दूध उत्पादकाचा आवाज सरकार दरबारी जाण्यासाठी झाल्याचे आज ग्रामीण भागातील दूध उत्पादकांमधील चर्चेमधून दिसून येत आहे याचाच परिणाम म्हणून रयत क्रांती संघटनेच्या झेंड्याखाली होत असलेल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी च्या मोर्चामध्ये दूध उत्पादक शेतकरी मोठ्या उत्साहाने स्वयंस्फूर्तीने सहभागी होत असल्याचे आगामी काळात होणाऱ्या मोर्चा मधून दिसून येणार आहे त्याचबरोबर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्यांच्या ऊसाला प्रति टन चार हजार रुपये भाव मिळण्यासाठी साखरेचे आधारभूत किंमत प्रति किलो चाळीस रुपये करण्यात यावी नैसर्गिक संकटामुळे त्याचबरोबर विविध पिकांना नसलेल्या बाजारभावामुळे शेतकरी कर्जाच्या ओजाखाली सापडला आहे त्यामुळे त्याला संपूर्ण कर्जमाफी मिळावी अशा विविध मागण्यांसाठी मंगळवार दिनांक 23/9/2025 रोजी सकाळी ठीक साडेदहा वाजता क्रांतिसिंह नाना पाटील चौक फलटण येथून तहसील कार्यालय फलटण येथे धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चाचे नेतृत्व आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत मोर्चाचे आयोजक सातारा जिल्हा रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल खराडे बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावरे बाजारांमधील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुनील मुळीक तसेच रयत क्रांती संघटनेचे प्रवक्ते खंडू करचे ,तालुकाध्यक्ष अभिमन्यू ढोपरे, खडेराव सरक, शेखर खरात, हेमंत सुतार, प्रसाद अनपट, सुधीर शिरसागर, दादा गोफणे, चेतन चव्हाण, संतोष सावळकर, राजेश खराडे, निलेश सोनवलकर, दीपक सस्ते, संतोष शेडगे, सागर डोईफोडे, साई शिंदे, पांडुरंग गायकवाड, योगेश संकपाळ, विशाल संकपाळ, तुकाराम गावडे, अमर गावडे, सागर सोनवलकर, अलंकार भोईटे, भरत नांगरे, प्रवीण कदम, बाळू शिंदे रामदास सोनवलकर, नवनाथ कुंडलकर, त्रिंबकराव डोंबाळे श्री दीपक डोंबाळे श्री अक्षय झणझणे आदी दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.