Bhor Breaking l भोरला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार : दोन नराधम पोलिसांच्या ताब्यात

सोमेश्वर रिपोर्टर live

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

भोर : संतोष म्हस्के

भोर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर वारंवार दोन नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अमानुष कृत्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून राजगड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली आहे.

या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात पोक्सो कायदा तसेच विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेले आरोपी म्हणजे महेश अरुण रसाळराज सुनिल तिखोळे हे दोघे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पीडित मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आले. महेश रसाळ याने ट्रॅक्टर शिकवण्याच्या बहाण्याने शेतात वारंवार बलात्कार केला. तर राज तिखोळे याने कारमध्ये तसेच घरात घुसून पीडितेवर अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, तब्येतीमध्ये त्रास जाणवू लागल्याने पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता ती सात महिन्यांची गरोदर असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर हा संतापजनक प्रकार उघडकीस आला.

स्थानिक नागरिकांनी आरोपींविरोधात तीव्र रोष व्यक्त केला असून, पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेबाबतचा पुढील तपास राजगड पोलिसांकडून सुरू आहे.

To Top