मोरगाव : प्रतिनिधी
चित्रकला ही केवळ एक कला भावना नसून ती एक भावना आणि अभिव्यक्ती आणि संवादाचे माध्यम आहे. महाराष्ट्र शासनामार्फत घेतल्या जाणाऱ्या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा निमित्ताने सर्वत्र तयारी सुरू आहे. या परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन करणारा हा विशेष लेख....
सर्वसाधारण माध्यमिक विद्यालयातून इयत्ता - सातवी पासून पुढे शिक्षण घेणाऱ्या मुलांना या परीक्षेत संधी दिली जाते. एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन प्रवर्गामध्ये परीक्षेची विभागणी होते. महाराष्ट्र शासनामार्फत घेतली जाणारी शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा अशीही या परीक्षेची ओळख आहे. विद्यार्थ्यांच्या लपलेल्या कलागुणांना एक व्यासपीठ देणारी अत्यंत महत्त्वाची अशी ही परीक्षा मानली जाते.
या होणाऱ्या परीक्षेत प्रामुख्याने चार विषयांचा समावेश केला जातो. वस्तू चित्र, स्मरण चित्र, संकल्प चित्र डिझाईन, भूमिती आणि अक्षरलेखन या विषयांच्या आधारे विद्यार्थ्यांनी तयारी करणे अपेक्षित असते.
विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी करताना.
ड्रॉइंग बोर्ड पाण्यासाठी लागणारे भांडे चित्र रंगवण्याचे ब्रश पेन्सिल रबर कंपास बॉक्स सुती कापड वॉटर कलर पेन्सिल कलर पोस्टर कलर व रंग खडू तसेच आऊटलाईन साठी काळ्या रंगाचा पेन इत्यादी साहित्य सोबत असणे आवश्यक आहे.
यासाठी त्यांच्या आधारे रेषा ,रंगछटा, प्रकाश, आकार , पोत, यामधील समतोल साधून केलेला आविष्कार यातून चित्र आकारास येते. रेखाटन प्रमाणबद्ध करून छाया प्रकाशा सह रंगकाम करावे लागते. बारकाव्याने रेखाटन करून पारदर्शक अथवा अपारदर्शक जलरंगात रंगवावे लागते.
मिळालेल्या कागदाला ( पेपर ) वर शोभेल एवढे रेखाटन मोठे काढावे. स्मरणचित्रासाठी सुयोग्य रचना करून रंगकाम करावे. संकल्प चित्र काढताना विविध अलंकारिक भौमितिक आकारांचा उपयोग करून दिलेल्या विषयावर विविध रंगसंगतीत हा संकल्प पूर्ण करावा लागतो. कर्तव्य भूमिती - रेषा रेषेचे भाग कोण आणि कोणाचे प्रकार दुभागून दिलेल्या प्रश्नानुसार भुमितिक रचना पूर्ण करणे अपेक्षित आहे. त्याच पद्धतीने अक्षरलेखनात रेखीव व विषयानुसार छत्रपती अक्षराला महत्व आहे. म्हणून ते रेखाटून रंगकामासह आकर्षक पद्धतीने पूर्ण करावे लागते. अशा सर्व विषयाची तयारी चित्रकला क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती व मार्गदर्शक शिक्षक यांच्याकडून विद्यार्थ्यांनी समजावून घ्यावी.
----------------
लेखक
ज्ञानेश्वर राऊत
कलाशिक्षक
श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोरगाव ता. बारामती