सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील मालवली येथील ड्रिमलॅन्ड इंग्लीश स्कुलचे चिमुकले आज शिक्षक झाले होते,निमित्त होते शिक्षक दिनाचे शिक्षक दिननानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील विद्यार्थी व विद्यार्थींनी शिक्षक बनले होते, एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत आल्याने विद्यार्थ्यामध्ये आनंदाचे वातावरण झाले होते विद्यालयातील सोहम चोरघे यांनी मुख्याध्यापक म्हणुन तर,पृथ्वीराज दसवडकर,सोहम सपकाळ,साईनाथ आधवडे, समर्थ उफाळे, गौतम माळी, तन्वी रणखांबे, काव्यांजली कोडीतकर,रिद्धी भोसले, अनुष्का लिम्हण, आर्यन रणखांबे, संग्राम लिम्हण, विश्वराज पायगुडे यांनी शिक्षक म्हणुन तर,यश शिंदे यांनी शिपाई म्हणुन काम पाहीले,दिवसभर मुलांनी वेगवेगळ्या वर्गावर वेगवेगळे विषय शिकवले,दिवसभर मुले शिक्षक
झाल्याने खुप आनंदाचे वातावरण त्याच्यामध्ये होते, शिकविताना अगोदर तयारी करावी लागते,समोर उभे राहुन बोलावे लागते आणि स्टेज डेअरींग असावे लागते अशी प्रतिक्रिया शिक्षिका झालेली काव्यांजली कोडीतकर या विद्यार्थ्यीनीने दिली.
विद्यालयातील मुलांनी शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते,डॅा.सर्वपल्ली राधाकृष्णण यांच्या प्रतिमेचे पुजन विश्वा फाऊडेशनच्या संचालिका सुप्रिया दसवडकर व प्राचार्य तृप्ती शिळीमकर यांच्या हस्ते करण्यात आले,त्यानंतर आज झालेल्या सर्व चिमुकल्या शिक्षकांनी मनोगते व्यक्त केले,प्राचार्य तृप्ती शिळीमकर यांनी शिक्षक दिनाचे महत्व सांगितले,सर्व विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचे गुलाबपुष्प व पेन देऊन शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.यावेळी शिक्षिका प्रियांका पाटील,स्वाती शेंडकर,हर्षदा देशपांडे,राणी दिघे,श्रेया पडवळ,सानिका शिंदे,शुभम सरपाले,नम्रता भगत,ऋतुजा दसवडकर,रेश्मा कांबळे, मिनल रणखांबे, प्राजक्ता शेडगे
तृप्ती येनपुरे, प्रणिता कोतवड, अभिलाषा गायकवाड,आदीसह विद्यार्थी उपस्थित होते,सुत्रसंचालन विद्यार्थ्तीनी तन्वी रणखांबे,संग्राम लिम्हण,यांनी केले तर आभार काव्यांजली कोंडीतकर यांनी मानले