Bhor News l भोर शहरात महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण : मंगळवार पेठेत वातावरण चैतन्यमय

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
प्रसन्न वातावरणात भोर शहरातील मंगळवार पेठेत श्रीमंत श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भोर आणि उन्नती महिला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शेकडो महिलांनी अथर्वशीर्ष पठण केल्याने वातावरण चैतन्यमय झाले होते. 
         अथर्वशीर्ष पठणावेळी श्री गणेशाय नमः चा नाद घुमताज परिसर चैतन्यमय व भक्तिमय झाला होता. यावेळी महाआरती करून महिलांची बीएमआय तपासणी घेण्यात आली.तर महिलांनी आहार कसा घ्यावा याविषयी सोनवणे मार्गदर्शन केले.नागराज महिला मंडळ ग्रुपच्या महिलांनी मंगळागौर साजरी केली.यावेळी उपविभागीय वनाधिकारी शितल राठोड यांच्या हस्ते आरती घेण्यात आली.यावेळी पोलीस निरीक्षक आण्णा पवार,उन्नती महिला प्रतिष्ठान अध्यक्ष सीमा तनपुरे,खजिनदार रेखा धरू, सुजाता धुमाळ, स्नेहा धरू ,सुप्रिया धरू ,मेघा आंबवले, भाग्यश्री वरटे,प्रीती शहा,अध्यक्ष मंदार जवळेकर,नितीन धरू,विनायक तनपुरे,विजय आंबवले प्रीतम धरू ,दिलीप वीर उपस्थित होते.
Tags
To Top