पुरंदर l निधन वार्ता l भिवरी येथील मंजुळा कटके यांचे निधन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
भिवरी (ता. पुरंदर) येथील मंजुळा दत्तात्रय कटके (वय ८० ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
     त्यांच्या मागे पती, दीर, पुतणे ,दोन मुले, दोन मुली, सुना ,जावई, नातवंडे असा परिवार आहे. चतुर्मुख भैरवनाथ पंचक्रोशी प्रासादिक दिंडी सोहळ्याचे माजी कार्याध्यक्ष, अध्यात्मिक व्यक्तिमत्व दत्तात्रय कटके यांच्या त्या पत्नी होत. तर प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर ज्ञानोबा कटके, नवनाथ कटके, गृहिणी कुसुम दळवी ,बायडाबाई बाठे यांच्या त्या मातोश्री होत. माजी पंचायत समिती सदस्य नामदेव कटके यांच्या त्या भावजय होत. जिल्हा परिषद सदस्या जनाबाई कटके यांच्या त्या जाऊबाई होत. तर वीर नेताजी तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब सोपानकाका कटके यांच्या त्या चुलती होत.
To Top