Baramati News l....अखेर सोमेश्वर कारखाना व दुकानदार वादावर पडदा : दोन्ही पक्ष न्यायालयीन खटले काढून घेणार

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील  सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या जागेतील दुकानदार व कारखाना प्रशासन यांचे मधे सुरू असलेला वाद शुक्रवारी दुपारपासून सुमारे चार तास चाललेल्या चर्चेनंतर अखेर मिटला असून दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध असलेल्या तक्रारी व न्यायालयीन वाद मागे घेण्याचे ठरले आहे.
    अधिक वृत्त असे की सोमेश्वर कारखान्याच्या मालकीच्या जागेत सुमारे ९० दुकानदार अनेक वर्ष भाडेतत्वावर राहत होते.कारखाना स्थापनेवेळी या दुकानदारांना जागा भाडेतत्वावर देण्यात आल्या होत्या.मात्र सध्या कारखान्याने विस्तारीकरण केल्याने तसेच उपपदार्थ प्रकल्प, सह वीजनिर्मिती प्रकल्प केल्याने कारखान्याकडे येणाऱ्या वाहनांची संख्या वाढली त्यामुळे रस्ता रुंदीकरण करण्यासाठी कारखान्याने दुकानदारांना रस्त्याच्या कडेलाच विना अनामत पर्यायी गाळे देण्याचा  व गाळे सुरू झाल्यावर जुनी दुकाने काढण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र क्षेत्रफळ,भाडे व करारनामा याबाबत दुकानदारांची वेगवेगळी मते असल्याने गेली दोन महिने त्यांच्यामध्ये तीन बैठका होऊन एकमत झाले नाही. कारखाना प्रशासन व व्यवसायिक यांच्या काही वाद झाल्यावर कारखान्याने संबंधितावर फौजदारी खटले करण्यासाठी तक्रार दाखल  केली. दरम्यान दुकानदार देखील न्यायालयात गेले. त्यामुळे वाद चिघळला. कारखाना अध्यक्ष  पुरुषोत्तम जगताप हे मी २८ हजार सभासदांचे नुकसान होऊ देणार नाही या मतावर ठाम होते.आमच्याही वाड वडिलांनी कारखान्याला जागा दिल्या पण आम्ही मालक झालो नाही. असे सांगत आपण पण कायदेशीरपणे कारवाई करू असे सांगितलें. वडगाव निंबाळकर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी  पुढाकार घेत सोमेश्वर चे ज्येष्ठ पत्रकार दत्ता माळशिकारे संतोष शेंडकर ,गणेश आळंदीकर, महेश जगताप व युवराज खोमणे यांचे समवेत दुकानदारांचे प्रतिनिधी महेश सत्तीगेरी ,अमोल जगताप,शेखर कदम व सुशांत सोरटे यांचेशी पोलिस स्टेशन मधे चर्चा केली. पहिली चर्चा सकारात्मक झाली. त्यानंतर सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी पोलीस बंदोबस्तात काम करणेसाठी विनंती केली.तेव्हा सपोनी नागनाथ पाटील यांनी सर्व दुकानदार व संचालक मंडळ यांची शेवटची एकत्र बैठक  घ्यावी अशी विनंती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांना केली. त्यानुसार अध्यक्ष जगताप यांनी एकत्रित बैठक बोलावली.त्यावेळी दुकानदारांच्या वतीने शशिकांत जेधे, नितीन कुलकर्णी, महेश सत्तेगिरी, सचिन अग्रवाल व हेमंत पवार ई नी आपले म्हणणे मांडले. सपोनी नागनाथ पाटील ,पी एस आय राहुल साबळे,पत्रकार संतोष शेंडकर यांनी गणेश आळंदीकर, ई नी आपापली मते मांडली. कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप,उपाध्यक्ष मिलिंद कांबळे,संचालक अभीराज सतीश काकडे,संग्राम सोरटे,ऋषिकेश गायकवाड,जितेंद्र निगडे, कारखाना माजी उपाध्यक्ष लक्ष्मण गोफणे यांनी सभासदांचे वतीने संस्थेचे हित व दुकानदारांचे पुनर्वसन याबाबत आराखडा करून दुकानदारांना  वाचून दाखवला.सदर प्रस्ताव दुकानदारांनी मान्य करून ३०० चौफुट,२०० चौ फूट व १५० चौफुट चे गाळे होणार असून प्रत्येक गाळ्या समोर १० फूट वाहनतळ,भाडे २० रु चौ फूट ठरले.दहा वर्ष करार करून देण्याचे ठरले.तसेच रस्त्यासाठी मागील बाजूस ज्यांचे  अतिक्रमण असलेले क्षेत्र असेल त्यांनी स्वतः काढून देणेचे ठरले असून दोन्ही पक्षांनी न्यायालय व पोलिस स्टेशन मधील दावे,तक्रारी काढून घेण्याचे ठरले.दुकानदारांचे वतीने शशिकांत जेधे यांनी आभार मानले व सदर प्रस्ताव मान्य असलेल्या सह्या याच सभेत दुकानदारांनी केल्या.
To Top