सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
भिवरी (ता. पुरंदर )येथील अध्यात्मिक व्यक्तिमत्व पंढरीनाथ तुकाराम गायकवाड (वय ७७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी ,एक मुलगा, चार मुली, सून जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
कानिफनाथ अमृततुल्यचे डायरेक्टर मच्छिंद्र गायकवाड, गृहिणी शोभा चव्हाण, लता चव्हाण, पूजा सणस,मनिषा शिंदे यांचे ते वडील होत. तर मल्हारगड विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, उद्योजक सतीश शिंदे यांचे ते सासरे होत.
