Baramati news l तिरुपती बालाजी मशरूम कंपनीतील कामगारांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील तिरुपती बालाजी मशरूम कंपनीतील ६५० कामगारांना दिवाळीनिमित्त किराणा किट तसेच बोनसचे वाटप करण्यात आले.
            आज कंपनीतील ४५० कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त किराणाकिट चे वाटप करण्यात आले. तसेच २०० कामगारांना रोख स्वरूपात बोनस दिला गेला. यावेळी कंपनीच्या संचालिका आशालता शिंदे, कंपनीचे सीओई संजय शिंदे, मशरूम कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर ओंकार शिंदे, अक्षय शिंदे फाउंडेशनचे सदस्य योगेश सोळष्कर, बाबूलाल पडवळ, संतोष शेंडकर, महेश जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. कंपनीतील कामगारांना दिवाळीनिमित्त २५०० रुपयांच्या किराणा किट चे वाटप करण्यात आले. किराणा किट वाटपाचे कंपनीचे हे नववे वर्ष आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रणजित चव्हाण यांनी केले तर बाबूलाल पडवळ यांनी आभार मानले.
To Top