Bhor News l प्लास्टिक हद्दपार करून कापडी पिशव्यांचा वापर करा : भोर नगरपरिषदेचे नागरिकांना आवाहन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के 
 स्वच्छ, सुंदर, हरित भोर शहर ठेवण्यासाठी प्लास्टिकला हद्दपार करून कापडी पिशव्यांचा वापर करण्याचा नागरिकांनी निर्धार करावा.तर जास्तीत जास्त नागरिकांनी कापडी पिशव्या वापरावे असे आवाहन भोर नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे. 
     नागरिकांनी सिंगल न्यूज प्लास्टिक कप, ग्लास, चमचे,स्ट्रॉ,डिश व १२० मयक्राँनच्या आतील पिशवी अशा सर्व प्लास्टिकवर बंदी आणून नागरिकांनी प्लास्टिक हद्दपार करण्यास मदत करावी.तरच भोर शहर,सुंदर,स्वच्छ व हरित राहण्यास मदत होईल. प्लास्टिकमुळे अनेक रोगांना सामोरे जावे लागते. रोगराई टाळण्यासाठी प्लास्टिक मुक्त होऊन कापडी पिशव्यांचा वापर करणे गरजेचे आहे अशी माहिती नगरपालिकेकडून मुख्याधिकारी गजानन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ओला,सुका कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडीवरील मदतनीस सुरेखा भिलारे,दिपाली खोपडे ,निशा पवार, सुनीता घोणे,संगीता तुंडलाइथ यांनी भोर शहरातील ठिकठिकाणच्या नागरिकांना दिली.बहुतांशी महिलांनी माहिती समजावून घेत प्लास्टिक पिशवी वापर बंद करून कापडी पिशवी वापरण्याचा निर्धार केला.तर श्रीपतीनगर चौपाटी येथील महिलांनी घंटागाडीवरील मदतनीस यांचे आभार मानले.
To Top