Javali News l वालुथ पोष्ट कार्यालयात सव्वा सहा लाखांचा अपहार : डाकपाल संजय चव्हाण याच्यावर मेढा पोलीसात गुन्हा दाखल

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : सोमनाथ साखरे
वालुथ तालुका जावली येथिल पोष्ट कार्यालयात सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्याने पदाचा गैरफायदा करून बचत खाते (SB), सुकन्या खाते (SSA), मुदत ठेव (TD) या खात्यामध्ये 11 खातेदारांनी विश्वासाने त्यांचे खात्यामध्ये पैसे भरणेकरीता दिले असता त्याने सुकन्या व बचत खात्यावर पैसे न भरता केवळ खातेदारांच्या पासबुकवर पैसे भरलेबाबत खोट्या नोंदी केल्याने मेढा पोलीस ठाण्यात डाकपाल संजय गणपत चव्हाण रा. वालुथ यांचे गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीसांनी दिली.
            याबाबत देण्यात आलेल्या माहिती नुसार दिनाक 19 फेब्रुवारी 2019 ते दिनांक - 26 मार्च 2024 या कालावधीमध्ये डाकघर कार्यालय शाखा वालुध ता. जावली जि. सातारा येथे कार्यरत असताना शाखा डाकपाल संजय गणपत चव्हाण रा. वालुथ ता. जावली जि. सातारा हे शासकीय नोकर म्हणुन कर्तव्य करीत असताना त्याने आपले पदाचा गैरफायदा घेवुन बचत खाते , सुकन्या खाते, मुदत ठेव या खात्यामध्ये 11 खातेदार यांनी विश्वासाने त्यांचे खात्यामध्ये पैसे भरणेकरीता दिले असता त्याने सुकन्या व बचत खात्यावर पैसे न भरता केवळ खातेदारांच्या पासबुकवर पैसे भरलेबाबत खोटी नोंद केली असल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे.
          पुढे तक्रारीमध्ये म्हटले आहे की, त्याचप्रमाणे मुदत ठेव खाते उघडणेकरीता पैसे स्विकारून मुदतठेव खाते न उघडता खातेदार यांना पोस्टाचे बनावट पुस्तक तयार करून देवुन खाते उघडल्याचे दाखवुन त्यांचेकडून पैसे स्विकारून त्याची ऑफिस रेकॉर्डमध्ये (SB जनरल, BO Account, BO Daily Account) या रजिस्टरमध्ये पैसे भरल्याची नोंद न करता व सरकारी हिशोबात सदरची रक्कम जमा न करता रक्कम रुपये 6 लाख २६ हजार ७१० चा स्वतः चे फायद्याकरीता वापर केल्याने संजय चव्हाण त्याचेविरुद्ध खातेअंतर्गत चौकशी चालु केली होती. 
        या दरम्यान संजय चव्हाण याने अपहारील रक्कमे पैकी रुपये रक्कम ३ लाख शासकिय खात्यात भरलेली आहेत व उर्वरीत रक्कम रुपये ३ लाख २६ हजार ७१० भरणेस टाळाटाळ करीत असल्याने आणि त्याने पोस्ट खात्याची व खातेदार यांची विश्वासघात करून फसवणुक केली असल्याचे तक्रारीत दाखल करण्यात आले आहे.
          याबाबत मेढा पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर संतराम डोंगरे, वय 37 वर्षे, व्यवसाय नोकरी, सध्या रा.मु.पोस्ट-बाई ता.बाई. जि.सातारा मुळ रा. प्लॅट नं. 107. साई निसर्ग शस्यु गार्डन, गुजरवाडी रोड, कात्रज पुणे, यांनी तक्रार दाखल केली असून संजय चव्हाण याच्यावर भारतीय दंड सहिता कलम- 406, 409, 420, 465 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हयाचा तपास अंमलदार एस. आर. दिघे हे करीत आहेत .
To Top