Daund Breaking l पत्नीचा गळा दाबून खून करत स्वतः गळफास घेत पतीने आयुष्य संपवलं : दौंड तालुक्यातील घटना

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
दौंड : प्रतिनिधी
दौंड तालुक्यातील रावणगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास
सुन्न करणारी घटना घडली आहे. पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला आणि काही वेळातच स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. हि घटना दि. १ रोजी घडली. 
          खून झालेल्या महिलेचे नाव जयश्री गावडे (वय ४५) असून आत्महत्या करणारे पती अशोक गावडे (वय ५०) असे आहे. दोघेही पती-पत्नी शेती करून उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या मागे दोन मुले आहेत. पत्नीचा खून केल्यानंतर अशोक गावडे यांनी राहत्या घरात सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली.
सकाळी गावकऱ्यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले. या घटनेचा तपास दौंड पोलीस करत आहेत. दरम्यान, दाम्पत्यामध्ये नेमका कशावरून वाद झाला आणि पतीने एवढं टोकाचं पाऊल का उचललं, याचा शोध पोलिस घेत आहेत.
To Top