सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अनेक प्रश्न व समस्या निर्माण होत असतात. जीवन जगताना त्यांना प्रत्येक संकटाचा मुकाबला करावा लागतो. त्यांच्या जीवनात हास्य व आनंद फुलवण्यासाठी समाजातील आर्थिक संपन्नता असणाऱ्या व्यक्तींनी सर्वतोपरी मदत करावी असे आवाहन सिंगापूर येथील सुप्रसिद्ध अंजीर व सीताफळ बागायतदार हनुमंत लवांडे यांनी केले.
सोनोरी (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सोनोरी गावचे माजी सरपंच, उद्योजक सतीश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य व का वाटप करण्यात आले. या प्रसंगी श्री. लवांडे बोलत होते. यावेळी रामभाऊ काळे. संतोष काळे. जालिंदर काळे, विलास काळे, आप्पा काळे, दीपक काळे यांचं सोनोरी शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा सुरवसे-बडदे व शिक्षकवृंद होते.
सतीश शिंदे म्हणाले ,येथील भविष्यकाळात शाळेला अजूनही काही मदत लागल्यास सदैव मदत करण्यास तयार आहे.