सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
भारत सरकार सोबत संलग्न असलेल्या,इंडिया बुलिअन अँड ज्वेलर्स असोसिएशन ( इब्जा ) या राष्ट्रीय संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी किरण आळंदीकर तर उपाध्यक्षपदी संतोष बागडे यांची आज फेरनिवड झाली तर राज्याच्या संचालक पदी बारामती येथील चंदूकाका सराफ पेढीचे प्रमुख किशोरकुमार शहा यांची नव्याने नियुक्ती झाली.
भारत सरकारच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या गोल्ड बॉण्ड ची किंमत इब्जा ने जाहीर केलेल्या दररोज च्या सोन्याच्या भावावर ठरवली जाते, यामुळे संपूर्ण भारतात इंडिया बुलिअन अँड ज्वेलर्स असोसिएशन ने जाहीर केलेले सोने चांदीचे भाव हे अधिकृत मानले जातात. असे निवडीनंतर किरण आळंदीकर यांनी सांगितले, पूर्वीची मुदत संपल्याने अध्यक्ष आळंदीकर यांचे सह सर्व पदाधिकाऱ्यांनी काही महिन्यापूर्वी राजीनामे दिल्यानंतर काल इब्जा चे राष्ट्रीय अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी सचिव सुरेंद्र मेहता यांच्या सोबत झालेल्या बैठकीत राज्याचे अध्यक्ष हरेश केवलरामानी यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र दिले.
इतर नूतन पदाधिकाऱ्यांची नावे आणि नियुक्ती पुढीलप्रमाणे..
सुधीर पोतदार ( सेक्रेटरी)
अंगद होनमाने ( सहसेक्रेटरी)
गणेश आळंदीकर ( कायदेशीर सल्लागार )
अमृतराज मालेगांवकर ( संचालक ) विजयकुमार भोसले ( संचालक ) सचिन भंडारी ( संचालक ) दिनेश लोळगे ( संचालक ) प्रकाश अदापुरे ( संचालक ) नितीन घोडके ( संचालक ) योगेश गटगिळे ( संचालक) सावकार शिराळे ( संचालक )
निवडीनंतर संघटनेच्या माध्यमातून सराफ सुवर्णकरांचे प्रश्न सोडवण्यासोबत च त्यांना अधिकाधिक सुविधा मिळवून देणे त्याच सोबत ग्राहकांसाठी स्थानिक पातळीवर विविध योजना पोचवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे अध्यक्ष किरण आळंदीकर यांनी सांगितले.