सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
कात्रज आगाराची कात्रज -सारोळा -कात्रज बस ससेवाडीवरून पुण्याकडे येत असताना दुचाकी देखील त्याच बाजूने जात होती.पीएमटीने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला असून अपघातात आकाश रामदास गोगावले (वय-२९ रा. ससेवाडी ता.भोर) व अनुष्का प्रकाश वाडकर (वय २७) यांचा मृत्यू झाला असून नेहा कैलास गोगावले (वय २० वर्ष रा.ससेवाडी ता. भोर) या जखमी असून त्यांच्यावर भारती हॉस्पिटल येथे उपचार चालू आहेत.
पीएमटीचे चालक सुधीर दिलीप कोंडे (वय ४२ वर्ष रा. आर्वी, पुणे) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यास वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात झाल्यानंतर काही काळ वाहतूक कोंडी होती.भारती विद्यापीठ वाहतूक विभाग व आंबेगाव पोलीस स्टेशनकडून वाहतूक सुरळीत करण्यात आली.कात्रज चौकापासून कात्रज घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती गुजर निंबाळकरवाडी फाटा तसेच भिलारेवाडी या सायंकाळच्या वेळी गर्दीचे प्रमाण मोठ्या प्रमाणा असते.या अगोदर देखील या वळणावर होऊन अपघात होऊन अनेकांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे यावरती उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.