सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील पंचायत समिती आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून काही ठिकाणी अपेक्षित 5आरक्षण पडले असल्याने इच्चुकांमध्ये खुशी झाली आहे तर काही ठिकणी गम झाल्याचे पहायला मिळत आहे. अपेक्षित आरक्षण न मिळाल्याने काही ठिकाणी निराशा झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून काही इच्छुक तयारी करत होते परंतु अपेक्षित आरक्षण मिळाले नसल्याने पदरी निराशा आली आहे. तर सुरुवातीपासून आरक्षण न पाहता तयारी करत असल्याने अपेक्षित आरक्षण मिळाल्याने फायदा झाला आहे
तहसील कार्यालय कडून पंचायत समिती सभागृहात आरक्षण कार्यक्रम नुकताच पार पडला. प्रांताधिकारी महेश हरिश्चंद्रे, तहसीलदार निवास ढाणे. नायब तहसीलदार मयूर बनसोडे, आदीसह कर्मचारी उपस्थित होते.
राजगड पंचायत समिती आरक्षण पुढील प्रमाणे
विंझर- सर्वसाधारण
वांगणी - सर्वसाधारण
पानशेत - सर्वसाधारण महिला
वेल्हे बु.- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला