सोमेश्वर रिपोर्टर टिम------
राजगड : मिनल कांबळे
पुण्यातील सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली असून आदेश बिऱ्हामणे टोळीतील हा गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत गुन्हा वेल्हे पोलिसांत नोंद करण्यात आलेला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हवेली डिव्हिजन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना अमोल शेडगे व मंगेश भगत यांच्या गोपनीय माहितीच्या आधारे कोळवडी फाटा येथे सापळा रचून संदीप सोमनाथ शेंडकर (वय २७), धंदा- शेती रा. दापोडे ता.राजगड. यास ताब्यात घेऊन त्याचे कडुन एक गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे याबाबत त्याचे विरदध वेल्हा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
तर त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन आणि कोंढवा पोलीस स्टेशन व सहकार नगर पोलिस स्टेशन - मध्ये असे एकूण 07 गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई ही पोलीस अधिक्षक संदीप गिल अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे पोलीस उपअधीक्षक सुनीलकुमार पुजारी व स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजी मोहिते, हेड कॉन्स्टेबल अमोल शेडगे, मंगेश भगत, तुषार भोईटे वैभव सावंत यांनी केली
